Android app on Google Play

 

परशुरामाचा कर्णाला शाप

 


महाभारताच्या अनुसार भगवान परशुराम हे भगवान विष्णूचेच अवतार होते. कर्ण देखील त्यांचाच शिष्य होता. कर्णाने परशुरामाला आपली ओळख एक सूतपुत्र म्हणून दिली होती. एकदा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते. त्याच वेळी कर्णाच्या मांडीला एक भुंगा (भ्रमर) येऊन कुरतडू लागला. परंतु गुरूच्या झोपेत व्यत्यय येऊ नये म्हणून कर्ण दुखणे सहन करत राहिला, पण त्याने परशुरामाला झोपेतून उठवले नाही. झोपेतून उठल्यावर जेव्हा परशुरामांनी ते पहिले तेव्हा ते समजून चुकले की कर्ण सूतपुत्र नाही तर क्षत्रिय आहे. तेव्हा चिडून परशुरामांनी कर्णाला शाप दिला की मी शिकवलेल्या सर्व शस्त्र - विद्यांची जेव्हा तुला सर्वाधिक गरज असेल, तेव्हा तुला त्यातील काहीही आठवणार नाही. परशुरामांच्या या शापामुळेच कर्णाचा मृत्यू झाला.