Android app on Google Play

 

श्रृंगी ऋषींचा परिक्षिताला शाप

 


पांडव स्वर्गात गेल्यानंतर अभिमन्यूचा पुत्र परीक्षित याने राज्य केले. त्याच्या राज्यात सर्वजण सुखी, समाधानी आणि संपन्न होते. एकदा राजा परीक्षित शिकार खेळता खेळता खूप दूर निघून गेला. तेव्हा तिथे त्याला शमिक नावाचे ऋषी दिसले जे मौन अवस्थेमध्ये होते. राजा परीक्षिताने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु ध्यानमग्न असल्यामुळे त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
हे पाहून तो क्रोधीत झाला आणि त्याने एक मेलेला साप ऋषींच्या गळ्यात टाकला. हि गोष्ट जेव्हा शमिक ऋषींचा पुत्र श्रृंगीला समजली तेव्हा त्याने परिक्षिताला शाप दिला कि आजपासून ७ दिवसांनी तक्षक नाग राजा परिक्षिताला दंश करेल आणि त्यातच त्याचा मृत्यू होईल.