राजा अनरण्य याचा रावणाला शाप
वाल्मिकी रामायणानुसार रघुवंशात एक पराक्रमी राजा होऊन गेला, ज्याचे नाव अनरण्य होते. जेव्हा रावण विश्वविजय करण्यासाठी निघाला तेव्हा राजा अनरण्य बरोबर त्याचे भयानक युद्ध झाले. त्या युद्धात राजा अनरण्य मारला गेला. मारण्यापूर्वी त्याने रावणाला शाप दिला कि माझ्याच कुळात जन्माला आलेला एक युवक तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. त्याच्याच वंशात पुढे प्रभू श्रीरामांनी जन्म घेतला आणि रावणाचा वध केला.