Android app on Google Play

 

ऋषि किंदम यांचा राजा पंडूला शाप

 


महाभारतानुसार एकदा पंडू राजा शिकार खेळण्यासाठी जंगलात गेले. तिथे त्यांना एक हरिणाचे जोडपे मैथुन करताना दिसले. त्यांनी त्यांच्यावर बाण सोडला. प्रत्यक्षात ते हरण आणि हरिणी ऋषी किंदम आणि त्यांची पत्नी होते. तेव्हा ऋषी किंदम यांनी पंडूला शाप दिला कि जेव्हा कधी तू एखाद्या स्त्रीशी समागम करशील त्याच वेळी तुझा मृत्यू होईल. याच शापाच्या प्रभावामुळे पंडू आपली पत्नी माद्री हिच्याशी मीलन करत असताना मरण पावला.