Android app on Google Play

 

कद्रू चा आपल्या पुत्रांना शाप

 


 महाभारतानुसार ऋषी कश्यप यांच्या कद्रू आणि विनता नावाच्या दोन पत्नी होत्या. कद्रू सर्पांची माता होती आणि विनता गरुडांची. एकदा कद्रू आणि विनता यांनी एक पांढऱ्या रंगाचा घोडा पहिला आणि पैज लावली. विनता म्हणाली कि घोडा पूर्णपणे पांढरा आहे, आणि कद्रू म्हणत होती कि घोडा तर पांढरा आहे, पण त्याची शेपटी काळी आहे. कद्रूने आपले म्हणणे खरे सिद्ध करण्यासाठी आपले पुत्र सर्पांना सांगितले कि तुम्ही सूक्ष्म रुपात घोड्याच्या शेपटीला चिकटून बसा, ज्यामुळे त्याची शेपटी काळी दिसून येईल, आणि मी पैज जिंकेन. काही सर्पांनी कद्रूचे सांगणे मान्य केले नाही. तेव्हा कद्रूने त्यांना शाप दिला कि तुम्ही सगळे जनमजेयाच्या सर्प यज्ञात भस्म होऊन जाल.