Android app on Google Play

 

तुळशीचा भगवान विष्णूंना शाप

 


शिवपुराणानुसार शंखचूड नावाचा एक राक्षस होता. त्याच्या पत्नीचे नाव तुलसी होते. तुलसी पतिव्रता होती, ज्याच्यामुळे देवता देखील शंखचूड राक्षसाचा वध करण्यास असमर्थ होते. देवतांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी शंखचूड राक्षसाचे रूप घेऊन तुलसीचा शीलभंग केला. आणि भगवान शंकराने शंखचूड राक्षसाचा वध केला. हि गोष्ट जेव्हा तुलसीला समजली तेव्हा तिने भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला, ज्याच्या प्रभावामुळे भगवान विष्णूंचे पूजन शाळीग्राम दगडाच्या रुपात केले जाते.