Android app on Google Play

 

उर्वशी चा अर्जुनाला शाप

 


महाभारताच्या युद्धापूर्वी जेव्हा अर्जुन दिव्य अस्त्र प्राप्त करून घेण्यासाठी स्वर्गात गेला, तेव्हा तिथे उर्वशी नावाची अप्सरा त्याच्यावर भाळली. हे पाहून अर्जुनाने तिला तू आपल्या मातेसमान आहेस असे सांगितले. हे ऐकून क्रोधीत झालेली उर्वशी म्हणाली, तू नपुंसकासारखे बोलत आहेस. म्हणून तू नपुंसक होशील, तुला स्त्रियांमध्ये नर्तक बनून राहावे लागेल. हि गोष्ट जेव्हा अर्जुनाने इंद्राला सांगितली तेव्हा इंद्र म्हणाला कि अज्ञातवासात हा शाप तुझी मदत करेल. तुला कोणीही ओळखू शकणार नाही.