Get it on Google Play
Download on the App Store

*संघ 17

थेरं कस्मीरगंधारं मज्झन्तिकमपेसयि।
अपेसेसि महादेवत्थेरं महिसमंडलं ।।३।।


काश्मीर आणि गांधार या देशांत (त्यानें) मज्झन्तिक नावांच्या स्थविराला पाठविलें. महादेव स्थविराला महषिमंडळाला पाठविलें.

वनवासिं अपेसेसि थेरं रक्खितनामकं।
तथापरन्तकं योनधम्मरक्खितनामकं।।४।।


वनवासीला (त्यानें) रक्खित नांवाच्या स्थविराला पाठविलें. त्याचप्रमाणें अपरन्तकाला योनघम्मरक्खित नांवाच्या स्थविरास पाठविलें.

महारट्ठं महाधम्मरक्खितत्थेरनामकं।
महारक्खित्थेरं तु योनलोकमपेसयि।।५।।


महाराष्ट्र देशांत (त्यानें) महाधम्मरक्खित नांवाच्या स्थविरास पाठविलें, आणि महारक्खित स्थविराला योन (यवन) लोक प्रदेशास पाठविलें.

पेसेसि मज्झिमं थेरं हिमवंतपदेसकं।
सुवण्णभूमिं थेरे द्वे सोममुत्तरमेव च ।।६।।

मज्झिम स्थविराला त्यानें हिमवंत (हिमालय) प्रदेशाला पाठविलें. सुवर्णभूमीला (ब्रह्मदेश?) सोण आणि उत्तर या दोन स्थविरांनां पाठविलें.

महामहिन्दथेरं१ (१ महामहिन्द हा अशोक राजाचा पुत्र होता; तो व त्याची बहिण संघमित्रा यांनी संघांत प्रवेश करून सिलोनांत बौद्धधर्माची स्थापना केली.) तं थेरं इट्ठियमुत्तियं।

संबलं भद्दसालं च सके सद्धिविहारिके।।७।।
लंकादीपे मनुञ्ञम्हि मनुञ्ञं जिनसासनं।
पतिठ्ठपेथ तुम्हेति पंच थेरें अपेसयि।।८।।

(त्याने) महामहिन्द, इट्टिय, उत्तिय, संबल आणि भद्दसाल या पांच आपल्या स्थविर शिष्यांनां ‘तुम्ही सुंदर लंकाद्वीपामध्यें मनोरम बुद्धधर्माची स्थापना करा’ असें सांगून (त्या द्वीपाला) पाठविलें.

सुवर्णभूमि ब्रह्मदेशासच म्हणत असत किंवा नाहीं याबद्दल शंका आहे. अपरन्त वगैरे प्रदेश कोठें होते याचीहि अद्यापि नीट शोध लागला नाहीं. वर सांगितलेल्या स्थानांपैकी लंकाद्वीप आणि हिमालय या दोन प्रदेशांत बौद्धधर्म आजला अस्तित्त्वात आहे. परंतु नेपाळ, तिबेट इत्यादि देशांत अशोकाच्या वेळेपासून बौद्ध धर्माची परंपरा कायम राहिली नाहीं. मध्यंतरी बौद्ध धर्माचा या देशांत लोप झाला, व कांही कालानें पुन: महायान१ (१ उत्तरेकडील बौद्ध महायान पंथाचे आहेत. महायानाचा उदय इ. स. २ र्या शतकांत झाला असावा.) पंथाचा प्रसार झाला. सांपत लंका (सिंहल), ब्रह्मदेश, सयाम व कांबोडिा या दक्षिणेकडील देशांतूनच अशोककालची परंपरा कायम राहिली आहे. एक तर या देशांतील सर्व धर्मग्रंथ पालिभाषेंत आहेत, व वज्रपाणि२ (२ वज्रपाणि, तारा, अविलोकितेश्वर इत्यादि देवतांचें महायानपंथामध्यें फारच प्रस्थ माजलें आहे. महायानाचे सगळे ग्रंथ संस्कृत भाषेंत लिहिले आहेत. कांहीं ग्रंथांची संस्कृत भाषाहि शुद्ध नाहीं.) तारा इ. देवकांचा समावेश या पंथात झालेला नाहीं. तेव्हां आजकाल ज्याला प्राचीन बौद्ध  धर्माची किंवा संघाची माहिती करून घ्यावयाची असेल त्यानें पालिभाषेंतील बौद्ध धर्मग्रंथांचें ज्ञान संपादावें हें उत्तम.