*धर्म 3
आरति विरति पापा मज्जपाना च संयमो।
अप्पमादो च धम्मेसु एतं मंगलमुत्तमं।।७।।
पापकर्माला कंटाळून त्याजपासून दूर राहणें, मद्यपानाविषयीं मनाचा संयम करणें व कुशल (पुण्य) कर्मांत दक्ष असणें, हीं उत्तम मंगलें होत.
गारवो च निवातो च संतुट्ठि च कतञ्ञुता।
कालेन धम्मस्सवनं एं मंगलमुत्तमं।।८।।
सत्पुरुषांचा गौरव करणें, नम्रभावानैं वागणें, संतुष्ट असणें, कृतज्ञ असणें आणि वेळोवेळी धर्मोपदेश ऐकणें, हीं उत्तम मंगलें होत.
खंति च सोवचस्सता समणानं च दस्सनं।
कालेन धम्मसाकच्छा एतं मंगलमुत्तमं।।९।।
क्षांति (सहन करणें), गोड बोलणें, श्रमणांची भेट घेणें आणि धार्मिक विषयांवर वारंवार संभाषण करणें, हीं उत्तम मंगलें होत.
तपो च ब्रह्मचरियं च अरियसच्चान दस्सनं।
निब्बानसच्छिकिरिया च एतं मंगलमुत्तमं।।१०।।
तपश्चर्या, ब्रह्मचर्य, चार आर्यसत्यें जाणणें व निर्वाणाचा साक्षात्कार करून घेणें, हीं उत्तम मंगलें होत.
फुट्ठस्स लोकधम्मेहि चित्तं यस्स न कंपति।
असोकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं।।११।।
(लाभ आणि हानि, यश आणि अपयश, निंदा आणि स्तुति, सुख आणि दु:ख या आठ) लोकस्वभावांशीं संबंध झाला असतां ज्यांचें चित्त न कांपतां शोकरहित, निर्मळ व सुखरूप राहतें त्याचें तें कृत्य उत्तम मंगल होय.
एतादिसानि कत्वान सब्बत्थ अपराजिता।
सव्बत्थ सोत्थिं गच्छन्ति तं तेसं मंगलमुत्तमं।।१२।।
वर सांगितलेल्या मंगलांचे आचरण करून कोठेंहि पराभव न पावतां जे स्वस्तिसुख मिळवितात, यांचें तें कृत्य उत्तम मंगल जाणावें.