समकालीन धर्मिक परिस्थिति 5
तपस्विता
''हे सारिपुत्त, माझी तपस्विता कशी होती, ती सांगतो.
(नि) मी नागवा राहत असें. लौकिक आचार पाळीत नसें. हातावर भिक्षा घेऊन खात असें. 'भदन्त, इकडे या' असें कोणी म्हटलें तर तें ऐकत नसें. 'भदन्त, उभा रहा' असें कोणी म्हटलें तर तें ऐकत नसें. बसल्या ठिकाणीं आणून दिलेल्या अन्नाचा, मला उद्देशून तयार केलेल्या अन्नाचा आणि निमंत्रणाचा मी स्वीकार करीत नसें. ज्यांत अन्न शिजविलें, त्याच भांड्यांतून अन्न आणून दिलें तर तें घेत नसे. उखळांतून खाण्याचा पदार्थ आणून दिला तर तो घेत नसे. उंबरठ्याच्या आणि दांडक्याच्या पलीकडे राहून दिलेली भिक्षा घेत नसें. दोघें जेवीत असतांना एकाने उठून दिलेली भिक्षा घेत नसें. गर्भिणी, मुलाला पाजणारी, किंवा पुरुषाशीं एकांतांत असणारी, अशा स्त्रियांकडून भिक्षा घेत नसें. मेळ्यांत आणि जत्रेंत तयार केलेल्या अन्नाची भिक्षा घsत नसें. जेथे कुत्रा उभा असेल, किंवा माश्यांची गर्दी आणि गोंगाट असेल तेथे भिक्षा घेत नसें. मत्स्य, मांस, सुरा, वगैरे पदार्थ घेत नसें.* एकाच घरांत भिक्षा घेऊन एकाच घासावर मी राहत असें. किंवा दोन घरांत भिक्षा घेऊन दोन घासांवर, याप्रमाणे सात दिवस वाढवीत जाऊन सात घरीं भिक्षा घेऊन सात घास खाऊन राहत असें. पळाभरच अन्न घेत असें. याप्रमाणे सात दिवस वाढवीत जाऊन सात पळे अन्न घेऊन त्यावर निर्वाह करीत असें. एका दिवसाआड जेवीत असें. दोन दिवसांआड जेवीत असें. याप्रमाणें उपासांची मर्यादा वाढवीत जाऊन, सात दिवसांआड किंवा पंधरवड्यांतून एक दिवस जेवीत असें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* जैन साधु मत्स्य आणि मांस घेत असत; पण सुरा घेत असल्याचा दाखला सापडत नाही. मांसाहाराची चर्चा अकराव्या प्रकरणांत केली आहे.

(इ) ''शाक, श्यामाक, नीवार, चांभाराने फेकलेले चामड्याचे तुकडे, शेवाळ, कोंडा, करपलेलें अन्न, पेंड, गवत किंवा गाईचें शेण खाऊन राहत असें. किंवा अरण्यांत सहजासहजीं मिळालेल्या फळमुळांवर निवाह करीत असें. मी सणाची वस्त्रें धारण करीत असें. मिश्र वस्त्रें धारण करीत असें. प्रेतांवर टाकलेलीं वस्त्रें धारण करीत असें. रस्त्यांतील चिंध्यांचीं वस्त्रें बनवून तीं धारण करीत असें. वल्कलें धारण करीत असें अजिनमृगचर्म धारण करीत असें. कुशांचें बनविलेलें चीवर धारण करीत असें. वाकाचें चीवर धारण करीत असें. मनुष्यांच्या केसांची कांबळ किंवा घोड्यांच्या केसांची कांबळ, अथवा घुबडांच्या पीसांचें बनविलेलें चीवर धारण करीत असें.
(नि) ''मी दाढीमिशा आणि केस उपटून काढीत असें. उभा राहून तपस्या करीत असें. उकिडव्याने बसून तपस्या करीत असें.
(इ) ''मी कंटकांच्या शय्येवर निजत असें. दिवसांतून तीनदा स्नान करीत असें. अशा प्रकारें अनेक परींनी देहमंडन करीत होतों. ही माझी तपस्विता.''
रुक्षता
''हे सारिपुत्त, माझी रूक्षता कशी होती हें सांगतों :-
(नि) अनेक वर्षांच्या धुळीने माझ्या अंगावर मळाचा थर चढला होता. जसा एखादा तिंदुक वृक्षाचा सोट अनेक वर्षांच्या धुळीने माखला जातो, तसा माझा देह झाला होता. पण मला असें वाटत नव्हतें की, हा धुळीचा पापुद्रा मी स्वतः किंवा दुसर्या कोणी तरी हाताने झाडावा. अशी माझी रूक्षता होती.''