बघ शिके लता मी नगरची कला ...
अंक चवथा - प्रवेश दुसरा - पद ४७
बघ शिके लता मी नगरची कला ।
अशा या वनी शांत दिसे हे नगर,
फिरे हा महावात म्हणे मी नृपवर; सबल नृपति विटप गमति,
वदति 'करचि लग्न' मला ॥ध्रु०॥
वनश्रीकरी पुष्पमाला विराजे; नवी माळ ही लग्नवेळेसि साजे;
महा वायु तो तीव्र वेगेचि आला; नसे बंधु हा लग्न मोडोनि गेला ।
वरावे कुणाला न ठावे मनाला, धरी ह्या कराला वसंता सुकाला ॥१॥
(चाल - 'मेरो दिलको चुराके.')
नाचाचे पद