धष्टपुष्ट नश्ट नवरडा , मा...
अंक दुसरा - प्रवेश पहिला - पद २२
धष्टपुष्ट नश्ट नवरडा, मारुनि ऐसा, अर्पिनगे रणनायक कंसा
कृष्णाचा बली मी, नच मेंढा जणु रेडा ॥ध्रु०॥
तर्पण त्याच्या करीन रुधिरे; जय येइल सम्राटा मम करे;
नरकी त्या कृष्णा देखा आजि, ठरविन यदुसि कुतरडा वेडा ॥१॥
(राग - सारंग-देस-मिश्र, ताल - त्रिवट. 'पाहू कोण धीट' या चालीवर.)