अति आनंद फुलवि कलिका; करी...
अंक तिसरा - प्रवेश दुसरा - पद ३६
अति आनंद फुलवि कलिका; करी नाच झकपक ही लत्तिका;
जवळि डुलत जणु, लचकत हळुहळु, पवन-चेट नट लटका ॥ध्रु०॥
'उचल' म्हणत मज,-'चटचट पद निज; बसेल फटका;
मनासि चटका, म्हणुनि त्वरित ही लगबग येत बालिका ॥१॥
(राग -गौडमल्हार, ताल - त्रिवट, 'मोरी नाजुक चुरिया' या चालीवर.)