जरि दिसला दुर्जन मला येथे...
अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ५
जरि दिसला दुर्जन मला येथे,
तरि वेश आंतुनी पळविन जसा कुटिल दुष्ट कावळा; कुकुट-गण न बोलाविला ॥ध्रु०॥
हंससरसि शुभ-विवाह मंगल, सुटली हाव या ग्रुध्राला ॥१॥
(राग - मुलताने, ताल - त्रिवट. 'इन दुरजन' या चालीवर.)