ती आत्मानंदा रसपररत शारदा...
अंक तिसरा - प्रवेश चवथा - पद ६०
ती आत्मानंदा रसपररत शारदा,
देव-धेय-धाम वरो तापसि हा गुरुसुत सदा ॥धृ०॥
महाधेय-सौख्यदा सेवा संसारतीता सुरगुरुपदा,
मोहाधीनासुरामदमंद असुरगणा मानाहो आपदा ॥१॥
राग भैरवी, ताल त्रिवट.
("सा ध प ध" या सुरावतीचे चालीवर.)