मधुकर वनवन फिरत करी गुंजा...
अंक दुसरा - प्रवेश पांचवा - पद ३१
मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला, भोगि पुष्पमाला;
अभिनव कुसुम मधुपा सहज सुचविति नूतन शृंगाराला ॥ध्रु०॥
भ्रमर सुरस वनिं दिसला कमला टाकुनि; कच अदय भयद झाला;
कोमजलें सुमनदल, दुखवि मजला ॥१॥
राग देस सोरट; ताल एक्का.
("पियाकरधर देखो धरकत है मोरि छतिया," या चालीवर.)