लकी ड्रॉ (Marathi)
किरण बंडू पवार
रमा आणि अशोक यांनी शहरात येऊन स्वत:च आस्तित्व स्थापन केलं, मुलाच्या शिक्षणासाठी सारंकाही केलं, पुढे मुलगा त्यांना सोडून गेला. पण रमा आणि अशोक ज्यावेळी गाव सोडून आले होते तेव्हा तरूणपणात पुण्यासारख्या शहरात आपलं साधं किमान एक वन बीएचके घर असावं ही त्यांची ईच्छा आजही अपूर्ण राहिली होती. अशोक फार मेहनती माणूस होता परंतु आता वय झालं होतं तरीदेखील ईच्छा मेलेली नव्हती, रमा आणि अशोक यांचा हट्ट चालूच होता. अनेकदा रमा आणि अशोक यांना बाजार खरेदीत बऱ्याच गोष्टी "लकी ड्रॉ" च्या माध्यमातून भेटत असायच्या. आणि रमाची ईच्छा एका क्षणाला वाढली, तिला वाटू लागलं लकी ड्रॉमधून आपण वन बीएचकेचं स्वप्न पुर्ण करूच शकतो. एके बाजूला पैशांची टंचाई होतीच, शिवाय अशोक आपला मेहनत करतचं होता. अशोकने एका टप्प्यावर ते स्वप्न सोडायचं ठरवलं, रमाला सांगितलं. रमाला खंत वाटली, पण तरीही ती एका शेवटच्या प्रयत्नासाठी गेली; जवळ उरलेली पुढील काही दिवसांची गरज भागवू शकणारी रक्कम घेऊन, अशोकला न माहित पडता तिने पुढाकार घेतला... पुढे काय घडलं असेल ?READ ON NEW WEBSITE