Get it on Google Play
Download on the App Store

प्रसंग 15

फ्लॅशबॅक

आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ 2 pm. ( दुपारची वेळ.)

( रवी मोठा झालायं, अशोक व रमा यांचही वय वाढलं आहे( दोघे जवळपास ५० च्या आसपास आहेत.)
( रमा घरातल्या देवाच्या मुर्ती/फोटो समोर हात जोडून बसली आहे. रवी ( वय 22 मोठा झालेला आहे.)काॅटवर बसला आहे.)

रमा देवा एकदा, टोकणात फक्त ते वन बीएचके लागू दे.

रवी काय आई तु? असा देव कुठे काही देतो का?

रमा अरे तुला नाही कळणारं, तू लहान असल्यापासून आम्हाला आजवर भरपूर टोकनं लागल्यात, लक चांगलच आहे आमचं फक्त ते वन बीएचके फ्लॅट चं झालं ना, मग स्वप्नचं पूर्ण होईल.

रवी तू आणि बाबा, दोघे धन्य आहात, बाबांना अख्या चाळीत टोकण नावाशिवाय कोण दुसरी हाकचं मारत नाही.

रमा बघं किती भारी गम्मतयं ना.

रवी गम्मत काय यात? इथपर्यंत ठिक होतं, बाहेर आता सगळी ओळखचं टोकण नावाने झालीये बाबांची.
( तेवढ्यात अशोक बाहेरून घरात येतो.)

अशोक काय गप्पा सुरूयेत दोघांच्या?

रमा काही नाही ओ सहजचं.

अशोक आज ना थोडक्यात गेलं, एक टिकिट होतं पण हुकलं रावं.
( अशोक काॅटवर बसतो.)

रवी बाबा, टोकणाचे हे नाद थांबवा ना आतातरी.
( रमा अशोकला पाणी देते, अशोक पाणी पिऊन घेतो. रमा जमिनीवर खाली सतरंजीवर बसते.)

अशोक थांबवायचं आहेच पण तुझं वन बीएचके घेऊन होईपर्यंत आम्ही करतो की प्रयत्न आमच्या परीने, काय गं रमा?

रमा हो ना.

रवी अवघडयं यार तुम्हाला समजावणं.
( असं म्हणतं उठून बाहेर निघून जातो.)

            प्रसंग समाप्त