प्रसंग 16
फ्लॅशबॅक
आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ 4 pm.
( अशोक, रमा आणि रवी घरात बसले आहेत, रमा गॅसवर चहा करत आहे, शेजारची गौरीही ( गौरीचं वय 20-21 च्या आसपास आहे.) तिथे आलेली आहे, गौरी सतरंजीवर बसली आहे.)
रमा चला चहा झालायं, पिऊन घ्या आता.
अशोक हो.
( गौरी रवी आणि अशोकला चहा देऊन सतरंजीवर तिचा चहा पित बसते.)
रवी हि कशाला आलीये इथे?
गौरी तुझं घर नाही आं हे, काका काकू आणि मी बघून घेऊ.
रमा रवी असं बोलायचं नसचं. बरं आपल्याला रवीचं लग्न कधी करायचं मग?
अशोक करू लवकरचं, आता आलायचं तो वयात.
रवी थोडं जास्तचं लवकर होतयं असं नाही वाटतं का?
गौरी एवढं काय कर की, बांधून घे बाशिंग गुडघ्याला बरं असतयं.
रवी तू जा ना रावं, नुसती कटकट करत असते. स्वत:च्या आयुष्याचं काही बघं.
रमा अरे एवढं लगे असं नको बोलू तिला, आणि ती बघते आहेच तिच्या करियरचं ती करेल लवकरचं काही.
अशोक हो ना, गौरी हुशारचं मुलगी आहे.
गौरी बघा रवी महाराज. ( हसते.)
रवी ए तू निघं बरं बाहेर, उगं इरिटेट नको करू आं मला.
गौरी चाललेचयं मी, ओ काकू येते नंतर, बाय.
( गौरी उठून घरातून जायला लागते.)
रमा हो ये. मनावर नको घेऊ गं त्याचं.
गौरी मनावर घ्यायला तो कुठं माझा नवरायं ( असं म्हणत रवीकडं पाहून हसते आणि निघून जाते. रवी चिडतो.)
प्रसंग समाप्त