प्रसंग 7
फ्लॅशबॅक
आतल्या बाजूस. रूम. प्रसंगाची वेळ 9 am. ( सकाळची वेळ.)
( रमा गॅसवर स्वयंपाक करत आहे, अशोक आरशात भांग पाड आहे, त्यांचा छोटा मुलगा रवी ( 6-7 वर्षांचा) घराबाहेर दारात खेळत आहे.)
अशोक रमा खुश आहेस ना?
रमा लग्नानंतर किती झपाट्याने गेले काही दिवस, आपलं मुल दारात खेळतयं यावर विश्वास नाही बसतं.
अशोक हो, पण अशाच काहीशा संसाराचा विचार केला होता आपण.
रमा हो ना, मग भरून गेलयं अगदी.
अशोक आता रव्याला शिकवायचा चांगला बास...
रमा रव्याला काय? रवी म्हणा.
अशोक एकचंय दोन्ही आपल्यासाठी मुलगाय आपला तो.
रमा मुलगा असला तरी, उद्या त्याचीही कोणीतरी मिसेस येईल, ती बरी तुम्हाला तिच्या नवर्याला असं म्हणू देईल.
अशोक अरे बार रे, असं आधीच ठरवून टाकलं तुम्ही थेट.
रमा हो मग?
अशोक चांगलयं की, आवडलं हे.
( रमा तेवढ्यात एक डबा भरून तो छोट्या पिशवीत घालते.)
रमा हा घ्या तुमचा डबा.
अशोक द्या, आता निघतो कामावर मी.
( अशोक डबा घेतो, आणि घराबाहेर निघतो.)
( बाहेर रवी दारातच उभा असतो.)
अशोक रवी, माझं नावं मोठ्ठ करशील पोरा. ( डोळ्यात आनंद आणि स्वत:चा उजवा हात पोराच्या डोक्यावर मायेने ठेवत.)
रवी बाय पप्पा.
अशोक बाय. येतो मी.
( अशोक निघून जातो, घराबाहेरचा रवी घरात निघून जातो.)
प्रसंग समाप्त