प्रसंग 22
आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ 1 pm. ( दुपारची वेळ.)
( शेजारची गौरी रमाकडे एक पेपर( वृत्तपत्र) घेऊन येते.)
गौरी काकू, पाहिलतं का हे?
रमा काय गं? काही पाहत नाही बघं आजकाल मी.
गौरी अहो टोकण लागण्याचे चान्सेस आहेत.
रमा मरू दे बाई आता, सोडला तो नाद आम्ही... चार दोन हजार गोळा करत करत वन बीएचके साठीची कमाई नाही जमावता येत गं.
गौरी अहो काकू तुम्ही एकदा बघा तर.
( पेपरमधील घर, फ्रीज, आणि वाॅशिंग मशीन अशी तीन चित्रांची जाहिरात रमाला दाखवते.)
रमा छान आहे फ्रीज, घर, कपडे धुवायची मशीनपण.
गौरी अहो, ऐका ही स्पर्धा आहे यात जर लकीली तुम्ही पहिल्या आलात तर वन बीएचके तुम्हाला मिळणारं.
रमा खरचं?
गौरी फक्त १० हजारांची खरेदी करावी लागेल.
रमा अगं बाई नको मग राहू दे.
गौरी अहो एकदा लास्ट टाईम ट्राय करा, आजवर जी टोकणं तुम्ही जिंकली त्यात घराचं बक्षिस कुठेच नव्हतं, कदाचित तुमच्यासाठीच हे असेल.
रमा तू म्हणतेस तर मग, ईच्छा होतेय माझी पण. अशोक येऊ दे.
गौरी काकू काकांना यायधा ऊशीर आहे तोवर वेळ संपेल, आपण दोघी जाऊयात चला, उरका पटकन.
रमा उरका काय? पैसे नकोत, थांब पाहू दे.
( रमा घरातल्या डब्यांमधे सेव्हींगचे पैसे शोधते, ते जवळपास १०, हजार निघतात.)
रमा दहा हजारचं का गं?
गौरी हो.
रमा भेटले, चल जाऊ आता आपण.
( दोघी घराबाहेर पडतात.)
प्रसंग समाप्त