Get it on Google Play
Download on the App Store

प्रसंग 18

फ्लॅशबॅक

आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ 9pm. ( रात्र)

( रवीचं लग्न झालयं. घरात त्याची बायको सुमन, तो व रमा अशोक असे चारजण आहेत.)

रमा छान झालं लग्न.

अशोक हो, मजा आली मस्त झाला सगळा कार्यक्रम वगैरे. काय रवी...
( रवी फक्त स्माईल करतो.)

रमा थकले असालं दोघं खुप, सुमन तुला सांगते आम्ही लवकरच वन बीएचके घेणार आहोत, तिथं गेलो ना जागेची काय अडचण येणार नाही बघं.

अशोक अहो त्या गप्पा नंतर करू, चला आता त्यांना त्यांच्या गप्पा गोष्टी करू द्या.

रमा हो.

( रमा व अशोक रूमच्या बाहेर जातात. रूममधे काॅटवर सुमन व रवीची चर्चा रंगते.)

सुमन तुझे आईवडील खरचं वन बिएचके घेतायेत?

रवी कशाचं काय, जन्मल्यापासून मी तेच ऐकतोय पण अजून काही पत्ता नाही.

सुमन अच्छा, पण आपल्याला संधी आहे बघं तू.

रवी हा संधी आहे खरयं, पण घर सोडताना थोडसं आल्हाद सोडावं लागलं.

सुमन हा बघा ते तुम्ही तुमच्या  हिशोबानी.

रवी हो बघावं मलाच लागणारंय सगळं.

( रवी त्याची नजर भिंतीवर टाकून विचारात गुंततो.)


            प्रसंग समाप्त