प्रसंग 21
फ्लॅशबॅक संपतो.
आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ 6pm. ( सायंकाळची वेळ.)
( रमा, अशोक दोघे काॅटवर बसले आहेत.)
रमा वाटलं नव्हतं ना अशा वेळेवर ती पोर आपल्या रवीला दूर घेऊन जाईल.
अशोक हो, रवीचं लग्न जमावताना वाटलं होत साधी आहे सांभाळून घेईल आपल्यालाही.
रमा पण लग्नाला चार एक दिवस होतात न होतात, तोच घेऊन गेली आपल्यापासून दूर केलं त्याला.
अशोक वन बीएचके.
रमा अं, हा हो. ( अचानक थोडासा धक्का बसल्यासारखं रमा करते.)
अशोक आवठलं न तुला आपलं स्वप्न काय होतं?
रमा अरे, हो, आवठलं की. वन बीएचके घ्यायचायं आपल्याला. पण ऊशीर झालायं आता, असं नाही का वाटतं?
अशोक प्रत्येक वेळ खास आहे बघं, मला वाटतं थोडे अजून प्रयत्न करूत, आपण घेऊ ना वन बीएचके. मी करतो प्रयत्न.
रमा चालेल, मी आहे सोबत तुमच्या.
( रमा अशोकाच्या हातावर स्वत:चा हात ठेवत त्याच्याकडे पाहते.)
प्रसंग समाप्त