प्रसंग 13
फ्लॅशबॅक
Ext. रूम बाहेरील चाळीतली मोकळी जागा.
( रवी आणि निशा कॅरम खेळत आहेत, सखू बाजूलाच बसून जरा खिल्ली उडवत आहे.)
रवी ए माझी बारी.
निशा अरे माझीये ना.
रवी काय तू मोठी असून चिडी खेळते.
निशा अरे हे बरयं म्हणजे, मोठा असलेला प्रत्येकजण चिडीचं खेळतो का?
सखू प्रत्येकजण नाही, रवी म्हणतोय म्हणजे तूच चिडत असशील?
निशा मी नाही खोट खेळत, बरं धर खेळ तू. ( कॅरमवरील स्ट्राईकर त्याला पास करते.)
रवी हां आता मी मारणारं, मीच जिंकणार.
सखू रवी, रवी, रवी.
निशा तुम्ही बी लहान बाळातच सामिल झालात.
सखू हो, मग काय?
निशा धन्ययं बाबा, ए खेळ रे तू.
( रवी तेवढ्यात एक गोटीला कॅरमच्या गोलात मारतो.)
रवी ये, जिंकणार आता मी.
निशा बरं बरं अजून बाकीये डाव, खेळ पटपट चल.
रवी हो.
( दोघे कॅरम खेळत राहतात, सखू बाजूला बसून रवीला चेअर करत आहे.)
प्रसंग समाप्त