प्रसंग 23
आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ 5.45 pm.( सायंकाळ.)
( रमा घरात खुश होऊन बसली काॅटवर बसली आहे. अशोक बाहेरून येतो.)
अशोक ( रमाला पाहून) खुपच मजेत? काय एखादा जॅकपाॅट लागला की काय?
रमा ( लाडाच्या स्वरात) माय लव्ह, तसचं काहीसं समजा.
अशोक अरे वा, मग काय आज गोडधोड?
रमा आज नाही उद्या.
अशोक ऊद्या? ( चेहर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून)
रमा हो, एक आॅफर होती. फर्स्ट प्राइज वन बीएचके, दहा हजारांची खरेदी करायची होती, आम्ही मी आणि गौरीने जाऊन केली आणि ऊद्या निकाल आहे.
अशोक अरे बाप रे! रमा पैसे कुठले वापरलेस? आपण बास करायचं ठरवलं होत ना, तू परत त्या वाट्याला पाऊल का ठेवलसं ?
रमा साॅरी, मला माहितीये ओ, पण प्रारब्धाच्या गोष्टी असतात एक शेवटचा पर्याय म्हणून एकदा करून पहावं म्हटलं मी.
अशोक बरं, ठीक आहे. पण आपल्याला घर भेटेलचं या आशेवर नकोस राहू आता, उद्या तिथे जाऊन जे आजवर झालयं तेच होईल, उगाच अपेक्षाभंग नको.
रमा ठीक आहे, दुपारी बारा वाजता या तिथे.
अशोक हो चालेल. मी आॅफीसवरून थेट तिथे येतो.
रमा चालेल ना.
( अशोक घराबाहेर जातो. रमा देवाच्या फोटो/मुर्ती जवळ बसून प्रार्थना करू लागते.)
प्रसंग समाप्त