जातें
सुन्दर माझें जातें गे फ़िरे बहुतेकें । ओव्या गाऊं कौतुकें तूं येरे बा विठ्ठला ॥१॥
जीव शिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटें गे । लावुनि पांची बोटें गे तुं ये रे बा विठ्ठला ॥२॥
सासु आणि सासरा दीर तो तिसरा । ओव्या गाऊं भ्रतारा तूं येरे बा विठ्ठला ॥३॥
बारा सोळा गडणी अवघ्या कामिनी । ओव्या गाऊं बैसूनि तूं येरे बा विठ्ठला ॥४॥
प्रपंच दळण दळिलें पीठ भरिलें । सासुपुढें ठेविलें तूं येरे बा विठ्ठला ॥५॥
सत्वाचें आधण ठेविलें पुण्य़ वैरिलें । पाप तें उतूं गेलें तूं येरे बा विठ्ठ्ला ॥६॥
जनी जातें गाईल कीर्त राहील । थोडासा लाभ होईल तूं येरे बा विठ्ठला ॥७॥