Get it on Google Play
Download on the App Store

निवडक अभंग संग्रह १२


*
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्या पुत्र होती जीं सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥२॥
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥३॥
तुका म्हणॆ मज घडो त्यांची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥४॥
*
बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥१॥
नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटॆं खरें ॥२॥
विष खावें ग्रासोग्रासी । धन्य तोचि एक सोसी ॥३॥
तुका म्हणॆ करुनि दावि । त्याचे पाय माझे जीवीं ॥४॥
*
पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरीचे दास जन्म घेती ॥१॥
कर्म धर्म त्यांचे झाला नारायण । त्याचेनि पावन तिन्ही लोक ॥२॥
वर्ण अभिमानें कोण झाले पावन । ऎसें द्या सांगुन मजपाशी ॥३॥
अंत्यजादी योनी तरल्या हरिभजनें । तयाची पुराणे भाट झालीं ॥४॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धार हा चांभार रोहिदास ॥५॥
कबीर मोमीन लतिफ़ मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णुदास ॥६॥
कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदु हरीचे पायीं ॥७॥
चोखामेळा वंका जातीचे महार । त्यासी सर्वेश्‍वर ऎक्य करी ॥८॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तिये सवें ॥९॥
मैराळ जनक कोण कुळ त्याचे । महिमान तयाचें काय सांगों ॥१०॥
यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऎसा वेदशास्त्रीं ॥११॥
तुका म्हणे तुम्ही विचारावें ग्रंथ । तारिलें पतित नेणो किती ॥१२॥
*
धन्य आजि दिन । झालें संतांचे दर्शन ॥१॥
झाली पापा तापा तुटी । दैन्य गेलें उठाउठी ॥२॥
झालें समाधान । पायीं विसावलें मन ॥३॥
तुका म्हणॆ आले घरां । तोचि दिवाळी दसरा ॥४॥
*
तुमचिये दासीचा दास करुनि ठेवा । आशिर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥
नवविधा काय बोलिली जे भक्ति । द्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥
तुका म्हणॆ तुमच्या पायांच्या आधारें । उतरेन खरे भवनदी ॥३॥
*
अमंगळ वाणी । नये आयकों ते कानीं ॥१॥
जो हे दूषी हरीची कथा । त्यासी क्षयरोगव्यथा ॥२॥
याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥३॥
तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥४॥
*
कीर्तन चांग किर्तन चांग । होय अंग हरिरुप ॥१॥
प्रेमें छंदे नाचे डोले । हरपले देहभावे ॥२॥
एकदेशीं जीव कळा । हा सकळा सोयरा ॥३॥
तुका म्हणे उरला देव । गेला भेव त्या काळें ॥४॥
*
जेथें कीर्तन करावें । तेथे अन्न न सेवावें ॥१॥
बुका लावूं नये भाळा । माळ घालुं नये गळां ॥२॥
तट्टावृषभासी दाणा । तृण मागो नये जाणा ॥३॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती तेही नरका जाती ॥४॥
*
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरिकथा ॥१॥
तारुं भवसागरींचें । उंच नीच अधिकार ॥२॥
चरित्र तें उच्चारावें । केलें देवें गोकुळीं ॥३॥
तुका म्हणे आवडी धरी । कृपा करी म्हणवुनी ॥४॥
*
स्वर्गीचें अमर इच्छिताती देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां ॥१॥
नारायणनामें होऊं जीवन्मुक्त । कीर्तन अनंत गाऊं गीतीं ॥२॥
वैकुंठीचें जन सदा चिंतिताती । कई येथें येती हरीचे दास ॥३॥
यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥४॥
तुका म्हणॆ पावावया पैल पार । नाम मंत्र सार भाविकासी ॥५॥
*
नाम घेतां उठाउठी । होय संसारासी तुटी ॥१॥
ऎसा लाभ बांधा गाठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥२॥
नामापरतें साधन नाहीं । जें तुं करिसी आणिक कांहीं ॥३॥
हांकारोनी सांगे तुका । नाम घेतां राहो नका ॥४॥

निवडक अभंग संग्रह

संकलित
Chapters
श्लोक ३ रा निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्णजन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन - ज्ञानेश्‍वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम । बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी