क्षीरापतीचे अभंग
क्षीरसागरींचें नावडे सुख । क्षीरापती देखे देव आला ॥१॥
कवळ कवळ पाहा हो । मुख पसरुनि धांवतो देवो ॥२॥
एकाद्शी देव जागरा आला । क्षीरापतीलागीं टोकत ठेला ॥३॥
व्दादशी क्षीरापती ऎकोनी गोष्टी । आवडीं देव देतसे मिठी ॥४॥
क्षीरापती घालितां वैष्णवां मुखीं । तेणें मुखें देव होतसे सुखी ॥५॥
क्षीरापती सेवितां आनंदु । स्वानंदे भुलला नाचे गोविंदु ॥६॥
क्षीरापती सेवितां वैष्णवा लाहो । मुखामाजी मुख घालितो देवो ॥७॥
क्षीरापती चारा जनार्दनमुखीं । एका एकीं तेणें होतसे सुखी ॥८॥
*
पाहे प्रसादाची वाट । द्यावें धुवोनियां ताट ॥१॥
शेष घेऊनी जाईन । तुमचें झालिया भोजन ॥२॥
झालों एकसवा । तुम्हां आळवोनी देवा ॥३॥
तुका म्हणे चित्त । करुनि राहिलों निवांत ॥४॥
*
पावला प्रसाद आतां विठो निजावें । आपुलाले श्रम कळों येताती भावें ॥१॥
आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरलें मनोरथ जातों आपुल्या स्थळा ॥२॥
तुम्हांसी जागवूं आम्हीं आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्मे दोष हराया पीडा ॥३॥
तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन । नाहीं निवडिलें आम्हां आपुलिया भिन्न ॥४॥