Get it on Google Play
Download on the App Store

निवडक अभंग संग्रह १९


*
आम्हां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरों शकेचि ना ॥१॥
जाणे माउली त्या खुणा । क्षोभ उपजो नेदी मना । शांतवूनि स्तना । लावीं अहो कृपाळे ॥२॥
तुज अवघे होऊं येतें । परि मज बाटों नये चित्ते । उपासने परतें । नये कांही आवडो ॥३॥
करूं रुपाची कल्पना । मुखीं नाम नारायणा । तुका म्हणे जना । जळस्थळ देखतां ॥४॥
*
आणॊनियां मना । अवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपुर निवासी ॥१॥
यासी अनुसरल्या काय । घडे ऎसें वायां जाय । देखिले ते पाय । सम जीवीं राहती ॥२॥
तो देखावा हा विध । चिंतनेंचि कार्य सिद्ध । आणिकां संबंध । नाहीं पर्वकाळासी ॥३॥
तुका म्हणे खळ । होती क्षणेंचि निर्मळ । जाऊनिया मळ । वाळवंटी नाचती ॥४॥
*
पंचभुतांचा गोंधळ । केला एके ठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥
तेथें काय मी तें माझें । कोण वागवी तें ओझें । देह केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥२॥
जीव न देखें मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोग शुभा अशुभासी ॥३॥
इच्छा वाढविते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकले तों पावेल ॥४॥
*
पंचभुतांचा गोंधळ । केला एके ठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥
तेथें काय मी तें माझें । कोण वागवी तें ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥२॥
जीव न देखें मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोग शुभा अशुभासी ॥३॥
इच्छा वाढविते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकले तों पावेल ॥४॥
*
लाभ झाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऎसी । उत्तम जोडी जोडीली ॥१॥
घेई हरिनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । झालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा ॥२॥
घेउनी माप हातीं । काळ मोजी दिवस राती । चोर लाग घेती । चोर लाग घेती । पुढें तैंसे पळावे ॥३॥
हित सावकासें । म्हणे करीन तें पिसें । हातीं काय ऎसें । तुका म्हणे नेणसी ॥४॥
*
भिक्षापात्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऎसियासी नारायणें । उपेक्षिजे सर्वथा ॥१॥
देवा पायी नाहीं भाव । भक्ति वरी वरी वाव । समर्पिला जीव । नाही तों हा व्यभिचार ॥२॥
जगा घालावें सांकडें । दीन होऊनि बापुडें । हेचि अभाग्य रोकडें । मुळ आणि अविश्‍वास ॥३॥
काय न करी विश्‍वंभर । सत्य करितां निर्धार । तुका म्हणे सार । दृढ पाय धरावें ॥४॥
*
अरे हा देह व्यर्थ जावें । ऎसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥
मग कैचें हरिचें नाम । निजलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दु:ख थोर साधलें ॥२॥
विषयसुखाचा लंपट । दासी गमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥३॥
आणिक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी संतनिंदा गोड । करी कवतुकें सदा ॥४॥
तुका म्हणे ऎसें । मना लावी रामपिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फ़ुकट जासी ठकोनी ॥५॥
*
दुजे खंडे तरी । उरला तो अवघा हरि । आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥१॥
इतुलें जाणावया जाणा । कोड तरी मनें मना । पारधीच्या खुणा । जाणतेणेचि साधाव्या ॥२॥
देह आधीं काय खरा । देह संबंधपसारा । बुजगावणॆं चोरा । रक्षणसें भासतें ॥३॥
तुका करी जागा । नको वा सपूं वाउगा । आहेसि तूं अंगा । अंगी डोळे उघडी ॥४॥
*
मेघवृष्टिनें करावा उपदेश । परि गुरुनें न करावा शिष्य । वाटा लाभे त्यास । केल्या अर्धकर्माचा ॥१॥
द्रव्य वेचावें अन्नछत्रीं । भूतीं द्यावें सर्वत्र । न घ्यावा हा पुत्र । उत्तम याती पोसणा ॥२॥
बीज न पेरावें खडकीं । ओल नाही ज्याचे बुडखीं । थीतां ठके शेखीं । पाठी लागे दिवाण ॥३॥
गुज बोलावें संतांसी । पत्नी राखावी जैसी दासी । लाड देतां तियेसी । वाटां पावे कर्माचा ॥४॥
शुद्ध कसुनि पाहाबें । वरिला रंगा न भुलावें । तुका म्हणे घ्यावें । जया नये तुटी तें ॥५॥
*
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधन इच्छा ते ॥१॥
मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥२॥
मन गुरु आणि शिष्य । करी आपुलेंची दास्य । प्रसन्न आप आपणांस । गतिअ अथवा अधोगति ॥३॥
साधक वाचक पंडित । श्रोते वक्‍ते ऎका मात । नाहीं नाहीं आन दैवत । तुका म्हणे दुसरें ॥४॥

 

निवडक अभंग संग्रह

संकलित
Chapters
श्लोक ३ रा निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्णजन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन - ज्ञानेश्‍वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम । बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी