Android app on Google Play

 

प्रारब्धपर अभंग

 

जे जे असेल प्रारब्धी । ते न चुके कर्मकधी । होणार्‍या सारिखी बुद्धी । कर्मरेषा प्रगटे ॥१॥
न कळे पुढील होणार । भूत भविष्य हा विचार । कर्म धर्म तदनुसार । भोगणे लागे सर्वर्था ॥२॥
ऎसा लिहुनि गेला विधाता । मग कासया कारावी ते चिंता । आपुलीया संचिता । कर्मरेषा प्रमाण ॥३॥
जैसे असेल आचरण । घडले  असेल पाप पुण्य । तैसे सानुकुल होतील कर्म । मान अपमान जन करित ॥४॥
काळ अनुकुल अथवा प्रतिकूल । परि सोडू नये आपुले धैर्यबळ । अनाचारी मन केवळ । नये बाटवूं सर्वथा ॥५॥
अखंड वाणी हरिस्मरणी । सुखी विश्रांती कीर्तनी । खेचर विसोबा म्हणे प्राणी । मनुष्य देह दुर्लभ ॥६॥
*
संचित प्रारब्ध क्रियमाण । न सुटे प्राणिया भोगिल्याविण । यालागी कारावे हरिचे स्मरण । तुटेल बंधन मग त्याचे ॥१॥
सत्कर्म करितां विधियुक्त । माजी निषेधाचा पडे आघात । सांग अथवा व्यंगा होत । होय ते संचित निश्र्चयेसी ॥२॥
उत्तम अधम कर्मे घडती । जाणतां नेणतां पदरी पडती ।  तेचि संचित होऊनि जाती । पुढे भोग द्यावया ॥३॥
पापपुण्यात्मक कर्में घडली । भोगितां उर्वरीत जी राहिली । फ़ळ द्यावया उभी ठाकली । प्रारब्धे लाभालाभ दायके ॥४॥
क्रियमाणे जे आतां आचरे । सत्कर्मे अथवा अकर्माकारे । जे जे निपजे नित्य व्यवहारे । क्रियमाण ऎसे बोलिजे ते ॥५॥
आतां तिहींचेही निस्तरण । घडे जेणे ते ऎक खुण । संचिते घडे  जन्ममरण । उत्तम अधम योनिव्दारे ॥६॥
जे जे योनी धरी जो जन्म । तेथीचे विहित तोचि त्य स्वधर्म । सांग नव्हतां भोगणे कर्म । नव्हेचि सुटिका कल्पांती ॥७॥
आतां  भलतेही योनि जन्म होतां । अनुतापें भजे जो भगवंता । नामे त्याची गातां वानितां । दहन संचिता भक्तियोगे ॥८॥
यावरी प्रारब्धे भोग येती अंगा । भोगितां स्मरे जो पांडुरंगा । निस्तरे प्रारब्धा तो वेगा । पावो अंतरंगा श्रीहरिते ॥९॥
जे जे नित्याने आचरत । ते ब्रह्मार्पण जो करित । अहंकृति न धरी फ़ळ काम रहीत । क्रियामाण जाळीत निष्कामता ॥१०॥
याचि लागी निळा म्हणे । कर्मपाश तुटती येणे । विठोबाच्या नामस्मरणे । यातायाती चुकती ॥११॥
*
झळझळीत सोनसळा । कळस दिसतो सोज्वळा ॥१॥
बरवे बरवे पंढरपूर । विठोबा रायाचे नगर ॥२॥
हे माहेर संताचे । नामयास्वामी केशवाचे ॥३॥
 

निवडक अभंग संग्रह

संकलित
Chapters
श्लोक ३ रा
निवडक अभंग संग्रह १
निवडक अभंग संग्रह २
निवडक अभंग संग्रह ३
निवडक अभंग संग्रह ४
निवडक अभंग संग्रह ५
निवडक अभंग संग्रह ६
निवडक अभंग संग्रह ८
निवडक अभंग संग्रह ९
निवडक अभंग संग्रह १०
निवडक अभंग संग्रह ११
निवडक अभंग संग्रह १२
निवडक अभंग संग्रह १३
निवडक अभंग संग्रह १४
निवडक अभंग संग्रह १५
निवडक अभंग संग्रह १६
निवडक अभंग संग्रह १७
निवडक अभंग संग्रह १८
निवडक अभंग संग्रह १९
निवडक अभंग संग्रह २०
निवडक अभंग संग्रह २१
निवडक अभंग संग्रह २२
श्री हनुमानजन्माचे अभंग
श्रीरामजन्माचे अभंग
श्रीकृष्णजन्माचे अभंग
मंगलाचरण पहिले
काकड आरतीचे अभंग
श्रीसदगुरु महिमा
संतसंगमहिमा
गौळण
दळण
विनंतीचे अभंग
उपसंहार व वरप्रसाद
श्रीसंत सदन महिमा
क्षीरापतीचे अभंग
प्रारब्धपर अभंग
नक्र उद्धार
नामधारकाची अधिकारश्रेष्ठता
मुका
काल्याचे अभंग
जोहार
जातें
एडका
दत्तस्तुती
दान महात्म्य (महिमा)
भजन - ज्ञानेश्‍वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम ।
बहिरा
आरत्या
मदालसा
एकादशीचे अभंग
द्वादशीचे अभंग
चांगदेव पासष्टी