Get it on Google Play
Download on the App Store

महात्मा गांधींचें दर्शन 10

प्रवचन २ रे

महात्मा गांधी हे धर्मपुरुष आहेत. त्यांची मूळची प्रेरणा धर्माची आहे. मोक्षप्राप्तीसाठी त्यांचे सारे जीवन राजकारण, अर्थकारण, समाजकारण,धर्मकारण या सर्वांत ते अहोरात्र भाग घेत आहेत. परंतु त्यांच्या या सर्व उद्योगांच्या मुळाशी मोक्षप्राप्तीची तळमळ आहे. मागे स्वराज्याचा चौरस म्हणून जो सांगितला त्यावर त्यांनी एक सुंदर लेख लिहिला होता. त्या लेखात ते स्पष्टपणे लिहितात की मोक्षासाठी, संपूर्ण सत्यदर्शनासाठी मी अधीर झालो आहे. महात्मा गांधींना राजकारण व धर्मकारण ह्या दोन संपूर्ण भिन्न अशा वस्तु वाटत नाहीत. धर्मासाठीच त्यांचे राजकारण आहे. ते मोक्षासाठी तळमळत आहेत. धर्म हा त्यांना प्राणासमान वाटतो म्हणूनच ते राजकारणांत आले. राजकारणांत आल्याशिवाय सत्याकडे पूर्णपणे जाता येणे शक्य नाही असे त्यांना निःशंकपणे दिसून पेक्षाहि सामाजिक व्यवहार अधिक व्यापक असतात. राजसत्तेला जनतेचा सहकार लागतो, त्यापेक्षाहि समाज नीट चालावा म्हणून अधिकच अन्योन्य सहकार हवा. समाजांत अन्योन्य सहकार नसेल तर सारे जीवनच अडेल. समाजामधे सहकार नसेल तर काहीच चालणार नाही. समाजाचा परिणाम आपल्यावर फार होत असतो. समाजांत जी ध्येये असतात, जे विचार असतात, ज्या रूढी असतात, त्या सर्वांचा आपल्या विचारसृष्टीवर परिणाम होत असतो. आपल्या मनावर या सर्व गोष्टींचे संस्कार होत असतात. आपले मन समाजरचनेशी जणू एकरूप असते. आपले जीवन सभोवतीच्या सामाजिक घटनेपासून अलग होऊ शकत नाही. सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय, समाजाची नीति सुधारल्याशिवाय मी तरी संपूर्ण सत्याचे दर्शन कसे घेऊ शकेन? समाजाच्या दोषांत मीहि भागीदार आहे. समाजाचे स्थूल व सूक्ष्म परिणाम माझ्याहि जीवनावर होत असतात. म्हणून माझा मोक्ष समाजाच्या सुस्थितीवर अवलंबून आहे. ज्या मानाने राजकीय गोष्टी, आर्थिक गोष्टी, सामाजिक गोष्टी सुधारतील, ज्या मानाने ह्या त्रिविध क्षेत्रांतील हवा शुध्द होईल, ज्या मानाने या तिन्ही क्षेत्रांत प्रकाश येईल, समता व न्याय येईल, अहिंसा व प्रेम येईल, त्या मानाने सत्याचा संपूर्ण साक्षात्कार होणे शक्य होईल. ज्या समाजांत हे सारे असेल, या राज्यव्यवस्थेत हे सारे असेल, त्यालाच महात्माजी रामराज्य म्हणतात. स्वराज्य-खरे स्वराज्य-ते हे. हेच सत्ययुग. महात्माजींचे रामराज्य  म्हणजे ज्या अर्थाने लोकशाही आपण समजतो ती नाही. आजची लोकशाही, आजचा नाझीझम, वा आजचा समाजवाद, या गोष्टी महात्माजींच्या रामराज्यांत नाहीत. या राजकीय तत्त्वज्ञानांतील चांगल्या गोष्टी महात्माजी घेतील. परंतु यातील कोणतीहि राज्यपध्दती सर्वस्वी त्यांना मान्य नाही. त्यांना सत्ययुगाकडे जायचे आहे. ज्या सत्ययुगाकडे त्यांना जायचे आहे, त्याची कल्पना त्यांनी मांडिली आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शुध्द करीत धर्माच्या शिखराकडे आपणांस जावयाचे आहे. धर्म हे स्वराज्याचे शिखर आहे. परंतु हा धर्म कोणता? उद्याच्या तुमच्या स्वराज्यांत, रामराज्यात कोणता धर्म राहणार? या प्रश्नाचे नीट उत्तर देऊन ठेवले पाहिजे. नाहीतर फार घोटाळा होईल. विशेषतः या हिंदुस्थानात जेथे नाना धर्मांचे व पंथांचे लोक आहेत तेथे फारच घोटाळे माजतील. म्हणून धर्म या शब्दाची फोड केली पाहिजे. महात्माजींनी तशी फोड केली आहे. ते म्हणतात, ''स्वराज्यांत जो धर्म राहील, रामराज्यांत जो धर्म राहील, त्या धर्मांत ज्याला परमोच्च धर्म आपण समजतो तोच फक्त राहील. त्या परमोच्च धर्माच्या पोटांत सारे धर्म येतात. सर्व धर्मांतील उच्च तेवढेच त्या धर्मांत येईल. त्यामुळे आपापल्या वैयक्तिक धर्मापेक्षाहि प्रत्येक धर्मांतील सदंश (चांगला भाग) घेऊन बनणारा जो परम धर्म तो श्रेष्ठ होईल. वाटले तर त्याला सत्यधर्म असे नाव द्या. परमसत्याचा धर्म. व्यवहारांतील सत्य नव्हे. सोयीसाठी वापरले जाणारे तात्पुरते सत्य, याचा हा धर्म नव्हे. तर शाश्वत सत्याचा धर्म. अहिंसेतील नैतिक तत्त्वाने आपण धर्म उदात्त व शाश्वत सत्याचा करू. अहिंसेतील सामाजिक तत्त्वाने समाजांतील संबंध प्रेमाचे करू. राजकारणांत व अर्थकार- लौकर अन्याय दूर होईल तितक्या लौकर माझा सत्य दर्शनाचा मार्ग मोकळा होईल. अन्याय लौकर दूर होण्यासाठी जास्तीत जास्त अधिक जनता उभी करणे हे कर्तव्यच ठरते. महात्मा गांधींची राजकारणाकडे बघण्याची ही अशी दृष्टि आहे. राजकीय प्रश्न हा सर्वंकष आहे. सर्वांच्या जीवनाला अनेक बाजूंनी स्पर्श करणारा हा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडून देता येणार नाही. राजकारण म्हणजे केवळ राजधर्म नाही. राजकारणांत राजाचा धर्म येतो तसाच प्रजेचाहि धर्म येतो. राजधर्मापेक्षा राजकारणाची व्याप्ति अधिक आहे. प्रजाधर्मांत इतर व्यवहार येतात तसाच राजकीय व्यवहारहि येतो. लोकांना आपण सांगितले पाहिजे की या मार्गाने जा. असहकार करा. महात्माजींना म्हणून राजकारणाचा प्रश्न आपल्या मोक्षमार्गांत समाविष्ट करावा लागला. दुसरीहि एक गोष्ट त्यांना दिसून आली की राजकीय प्रश्नाप्रमाणेच आर्थिक प्रश्नही जीवनांत महत्त्वाचा आहे. सामाजिक आर्थिक घडी नीट नसेल, सर्वत्र अन्नान्नदशा असेल तर मोक्षार्थी माणसाचे मोक्षाकडे लक्ष कसे लागेल? जोपर्यंत सर्वांना पोटभर अन्न देता येत नाही, तोपर्यंत देवाचे नाव मी त्यांना कोणत्या तोंडाने सांगावे? संपूर्ण मानवी जीवनाचा पाया जोपर्यंत सुदृढ नाही तोपर्यंत मानवाला आत्मोन्नतीची आशा नाही. राजकारणांतील अन्याय दूर करण्यासाठी ज्याप्रमाणे मोक्षार्थी पुरुषाने उठले पाहिजे त्याचप्रमाणे सामाजिक विषमता, आर्थिक विषमता दूर करावयासहि त्याने उभे राहिले पाहिजे. मनुष्याची जगण्याची इच्छा फार प्रबळ असते. ही जी अदम्य जीवनाशा, तिच्यांतूनच धनाशा जन्मते. धनाशा जीवनाचाच एक भाग आहे. जगामध्ये जी अनंत पापे होत असतात, ज्या मारामा-या, ज्या लढाया होत असतात, ज्या स्पर्धा चाललेल्या असतात, त्या सर्वांच्या मुळाशी जीवनाची आशा आहे. अहिंसापालनास अपाण ज्या मर्यादा घालू लागतो त्याचे कारणहि ही जीवनाशा आहे.  आपणांस या जगांत वागतांना असे दिसून येते की जगण्यासाठी आपणांस अनेकांना त्रास द्यावा लागतो; हिंसा करावी लागते. दुस-यांस त्रास न देता कसे जगावे हा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत अहिंसेचे नीट पालन करणे शक्य होणार नाही. समाजांतील आर्थिक व्यवहार ज्या मानाने अहिंसक होऊ लागतील त्या मानाने आत्मप्राप्ति करून घेणे शक्य होत जाईल. आत्मप्राप्ति अहिंसेशिवाय होऊच शकत नाही. म्हणून महात्माजींना आर्थिक क्षेत्रांत पडावे लागले. आर्थिक क्षेत्रांत अहिंसा कशी आणावी याचा ते विचार करू लागले. मी आर्थिक रचनेला जर अहिंसक पाया न देईन तर मला संपूर्ण सत्याचे दर्शन होणे अशक्य आहे, असे महात्माजींस वाटले. कारण सत्यदर्शन अहिंसेच्याच प्रकाशात होऊ शकते. राजकारणांत अहिंसा, आर्थिक व्यवहारांत अहिंसा, त्याचप्रमाणे  सामाजिक व्यवहारांतहि अहिंसा आणायला हवी. अहिंसेच नैतिक व सामाजिक असे द्विविध स्वरूप आहे. समाज नीट राहावा यासाठी समाजांतील संबंध सलोख्याचे हवेत. गुण्यागोविंदाचे हवेत. सामाजिक संबंध प्रेमाचे, अहिंसेचे नसतील, ते विषमय असतील, विषमतेने भरलेले असतील, तर समाजांत राहणे अशक्य होईल. तेथे हिंसेचे थैमानच राहील. राजकारणा होती की ''चार प्रकारच्या उणीवा आम्ही नाहीशा करणार आहोत.

महात्मा गांधींचें दर्शन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
महात्मा गांधींचें दर्शन 1 महात्मा गांधींचें दर्शन 2 महात्मा गांधींचें दर्शन 3 महात्मा गांधींचें दर्शन 4 महात्मा गांधींचें दर्शन 5 महात्मा गांधींचें दर्शन 6 महात्मा गांधींचें दर्शन 7 महात्मा गांधींचें दर्शन 8 महात्मा गांधींचें दर्शन 9 महात्मा गांधींचें दर्शन 10 महात्मा गांधींचें दर्शन 11 महात्मा गांधींचें दर्शन 12 महात्मा गांधींचें दर्शन 13 महात्मा गांधींचें दर्शन 14 महात्मा गांधींचें दर्शन 15 महात्मा गांधींचें दर्शन 16 महात्मा गांधींचें दर्शन 17 महात्मा गांधींचें दर्शन 18 महात्मा गांधींचें दर्शन 19 महात्मा गांधींचें दर्शन 20 महात्मा गांधींचें दर्शन 21 महात्मा गांधींचें दर्शन 22 महात्मा गांधींचें दर्शन 23 महात्मा गांधींचें दर्शन 24 महात्मा गांधींचें दर्शन 25 महात्मा गांधींचें दर्शन 26 महात्मा गांधींचें दर्शन 27 महात्मा गांधींचें दर्शन 28 महात्मा गांधींचें दर्शन 29 महात्मा गांधींचें दर्शन 30 महात्मा गांधींचें दर्शन 31 महात्मा गांधींचें दर्शन 32 महात्मा गांधींचें दर्शन 33 महात्मा गांधींचें दर्शन 34 महात्मा गांधींचें दर्शन 35 महात्मा गांधींचें दर्शन 36 महात्मा गांधींचें दर्शन 37 महात्मा गांधींचें दर्शन 38 महात्मा गांधींचें दर्शन 39 महात्मा गांधींचें दर्शन 40 महात्मा गांधींचें दर्शन 41 महात्मा गांधींचें दर्शन 42 महात्मा गांधींचें दर्शन 43 महात्मा गांधींचें दर्शन 44 महात्मा गांधींचें दर्शन 45 महात्मा गांधींचें दर्शन 46 महात्मा गांधींचें दर्शन 47 महात्मा गांधींचें दर्शन 48 महात्मा गांधींचें दर्शन 49 महात्मा गांधींचें दर्शन 50 महात्मा गांधींचें दर्शन 51 महात्मा गांधींचें दर्शन 52 महात्मा गांधींचें दर्शन 53 महात्मा गांधींचें दर्शन 54 महात्मा गांधींचें दर्शन 55 महात्मा गांधींचें दर्शन 56 महात्मा गांधींचें दर्शन 57 महात्मा गांधींचें दर्शन 58