लेखकाचे मनोगत
आज हाती घेतलेले कार्य पूर्ण झाल्याचे समाधान मिळत आहे .कृष्णमूर्तींनी मांडलेले विचार वाचून माझ्यामध्ये परिवर्तन झाले .पूर्वी मी नास्तिक होतो आता मी नास्तिक व आस्तिक यांच्या पलीकडे गेलो. आडपडद्याशिवाय दुसर्यांचे विचार माझ्यापर्यंत सरळ पोचू लागले.जास्त सत्य बोलायचे तर लोक बोलत असताना मला माझी जास्त ओळख पटत जात आहे. जीवनाची, प्रत्येक व्यक्तीची अपरिहार्यता, मला उमजली .पूर्वी जग बरोबर चालत नाही असे मला वाटत असे.आता चूक व बरोबर यांच्या पलीकडे मी गेलो आहे.साक्षित्व, निवडशून्य जागृतता, माझ्याजवळ आहे नाही याबद्दलची जागृतता निर्माण झाली आहे.
कृष्णमूर्तींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत असे मला वाटत होते .मला समजलेले कृष्णमूर्ती एकवीस भाग व मला उमजलेले कृष्णमूर्ती अडतीस भाग यातून मी ते पोचवण्याचा प्रयत्न केला .
सर्वांनी हे विचार वाचावेत असे मला वाटते .प्रत्यक्षात विशेष कुणीच त्याकडे पाहात नाही .याची मला पूर्णपणे जाणीव आहे .
आज ना उद्या लोक ते विचार वाचतील समजतील उमजतील असा मला विश्वास आहे.
आज शेवटचा भाग वाचकांसाठी उपलब्ध करून देऊन मला समाधान वाटत आहे .
प्रभाकर पटवर्धन