भावाचा भूकेला देव माझा भल...
भावाचा भूकेला देव माझा भला । खाई भाजीपाला विदुराचा ॥१॥
दुर्योधनमेवा न रुचे केशवा । उंचनीच हेवा नसे मनीं ॥२॥
प्रेमें विण भक्ति स्नेहें विण दीप्ति । व्यर्थ होतां कष्टी काय फळ ॥३॥
स्वप्नाचे पक्वान्नें तृप्तीचें बोलणें । कंठा विण गाणें व्यर्थ जगीं ॥४॥
’रंग’ लागी छंद भजनें मुकुंद । सच्तिसुखकंद दूर नसे ॥५॥