सर्व निगामाचें सार । ब्रह...
सर्व निगामाचें सार । ब्रह्म सत्य जग निःसार ॥१॥
मनोभावें गुण गावें । रुप देवाचें तें ध्यावें ॥२॥
परकार्यीं देह जावा । लाभ अनंत हा घ्यावा ॥३॥
जगीं मरुन उरावें । कीर्तिरुपें अमर व्हावें ॥४॥
ब्रह्मीं एकरस व्हावें । ’रंग’ अरंग तें पहावें ॥५॥