मन संसृतिसांकडें । मनें ल...
मन संसृतिसांकडें । मनें लावियेलें वेडें ॥१॥
भुलुनी आत्मसुख बळें । हाडचामीं जीव खेळे ॥२॥
कोण कोठोनी ना कळे । नाहीं तेथें जीव भूले ॥३॥
अवघा संकल्पाचा खेळ । परब्रह्म तें निर्मळ ॥४॥
अभ्र सारितां आकाश । चित्रमूळीं पटभास ॥५॥
स्पंदनिःस्पंदरहित । भासे ’रंग’ सच्चित्सुख ॥६॥