तुम्हीं ऐका सर्व संत ...
तुम्हीं ऐका सर्व संत । द्वारीं आलों भवजंत ॥१॥
नेणों मागों कैसी भीक । द्यावी आपोआप शीख ॥२॥
नका पाहूं गुणदोष । अपराधांचा भरला कोश ॥३॥
तुम्हीं उदार कल्पतरु । नका पाहूं अधिकारु ॥४॥
काळा काजळ कोळसा । अग्निसंगें झाला कसा ॥५॥
तैसा दुःशील मी खळ । ’रंग’ करा हो निर्मळ ॥६॥