धेंनु जेवीं वत्सा धांव दत...
धेंनु जेवीं वत्सा धांव दत्ता तैसा ।
तुज विण कैसा राहूं जगीं ॥१॥
कोठें जाऊं आतां कोण करी शांत ।
तुज विण त्राता आन नसे ॥२॥
येईं येईं दत्ता पतितोद्धर्ता ।
भवभयहर्ता तूंचि माझा ॥३॥
नको पाहूं अंत सदया अनंत ।
उद्धरीं हा जंत ’रङग’ तोका ॥४॥