सर्व साधनांचें सार । आत्म...
सर्व साधनांचें सार । आत्म अनात्म विचार ॥१॥
देव कोण देह कोण । मन प्राण इंद्रिय कोण ॥२॥
सर्वां भूतीं देव एक । निरंजन सच्चित्सुख ॥३॥
तेथें अहंस्फुरण माया । ज्ञान अज्ञानाची काया ॥४॥
ज्ञानें परिच्छिन्न शिव । छिन्न अज्ञानें तो जीव ॥५॥
व्यष्टिसमष्टीचा झाडा । पिंड ब्रह्मांड निवाडा ॥६॥
स्वप्नीं लगीनसोहळा । वंध्यापुत्र जन्मा आला ॥७॥
तेणें नाथिले सुरवर । कैंची मिटे येरझार ॥८॥
ज्ञान अज्ञान सांकडें । पैल ब्रह्म तें रोकडें ॥९॥
रंग रुप नाहीं जेथें । कुळ गुण केवीं तेथें ॥१०॥
चारि साही झाल्या कष्टी । अठरा वर्णितां हिंपुटी ॥११॥
सोऽहं शब्दें हंस भेटी । ’रंग’ अरंगी ते ज्योति ॥१२॥