नवा प्रवास
अरुण वि .देशपांडे
जायचेच नाही ज्या रस्त्याने
चवकशी करायची कशाला
रस्त्याने केलीय का चौकशी
ए इथून चालला कशाला ?.....!
आयते मिळावे सदा अपेक्षा
अशा निलाजऱ्या आळश्यापेक्षा
काम करणारा लाखपट बरा
जो घेतो मेहनतीचा आसरा .....!
ऐषोआरामाचे पाहून जगणे
कमनशीबी गाती रडगाणे
नशीबी असेल तितकेच मिळते
हे का बरे तयासी ना कळते .....!
करणे जे जे ते सारे चूक केले
खापर दुसर्याच्या माथी फोडले
कोण ऐकुनी घेईल उगीच असे
उपाय न करता काम होईल कसे...!
जागव रे आता तरी विस्वासा
असू दे तुझा तुझ्यावर भरोसा
काही बिघडले नाही रे अजुनी
कर सुरुवात तू नव्या प्रवासा.....!