जगताय का तुम्ही...?
संकेत मुळगावकर
हृदयाचे ठोके तालात वाजतात,
आणि ब्लडचं प्रेशर पण नॉर्मल आहे
म्हणून तुम्ही जगतायचं असं नाही...
दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःला "sacrifice" करणं जर तुम्हाला जमत असेल
तर जगताय तुम्ही...
'लोकं काय बोलतील' याचा विचार न करता, तुमचे छंद
जोपासत असाल
तर जगताय तुम्ही...
आयुष्यातील सर्व गोष्टींना "positively" फिरवण्याची
जादू तुम्ही शिकला असाल
तर जगताय तुम्ही...
लोकांच्या यशाच्या, प्रगतीच्या वार्ता ऐकून तुम्हाला जर
खरंच आनंद होत असेल
तर जगताय तुम्ही...
एखाद्या "movie" मधील "emotional seen" बघून
जर तुमच्या डोळ्यांत पाणी येत असेल तर
जगताय तुम्ही...
शेवटी काय प्रत्येकाच्या "dopamine release चं" कारण काहीही असो, मिळणार फक्त एकच आहे "आनंद"...!