मनातील कविता
अरुण वि .देशपांडे
मनात खूप काही
नित्य साठुनी राहते
उसळे आतूनी ते
कविता होऊनी येते …… !
कवितेचे असे येणे
कधी सहज नसते
पहावी लागते वाट
कधी कधी ते सुचते ….!
वाटते क्षणात जमावी
कवी सारखीच कविता
नंतर कळे असे नसते
कविता वेगळी असते ….!
ज्याची त्याची असते
लेखनाची प्रतिभा
मनापासूनी जी येते
कविता आपली असते ….!