Android app on Google Play

 

पेपरवाला

 

"माझे व्यासपीठ कविसंमेलन" (मलाड) २८ मे, २०१७ मधील उत्कृष्ठ कविता म्हणून निवड.
गणेश पावले

लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा कणा समजला जाणारा "ज्ञानदूत" म्हणचे "वृत्तपत्र विक्रेता". ऊन, वारा, पाऊस अथवा कितीही मोठे संकट आले तरी कधीही न थांबणारा, संपूर्ण मुंबई थांबली तरी घरोघरी पेपर पोहचवणारा, असंख्य संकटांना सामोरं जात.. ध्येय्याने जीवन जगणारा एकमेव माणूस म्हणजे वृत्तपत्रविक्रेता.  त्याची व्यथा व कथा मांडणारी ही कविता.... "मी पेपरवाला"
 
मध्यानरात्री जाग येते..
पाय धावन्यास सज्ज माझे
पहाटेच गोड स्वन..
कधीच विसरले घराचे दरवाजे..

नाही थारा त्या सूर्यास कधी,
किती लवकर हा उगवतो..?
दोन्ही हातात ओझ घेवून,
मी धावत पळत चालतो..

चालता चालताना रंगवतो स्वप्न,
घर माझं मनात सजलेल..
काबाड़ कष्ठ करणार माझं पोरग,
परदेशात जाऊन शिकलेल..

बचत करत आयुष्य अवघे,
काढतो रसत्याच्या कडेला..
फुटपाथ वर स्टॉल माझा,
टेबलवजा थाटलेला...

ज्ञानदूत मि जगाचा,
रोज तुमच्या दारी येतो..
बंद घराची कडी तुमच्या,
कोण साधी विचारपुस करतो..?

येतात मलाही संकटे,
काळजावर दगड ठेवतो...
घरात माय मेली तरी,
कोण तीचे दिवस पाळतो...?

नाही सोडले मी घर... जर
तर... पेपर कोण टाकेल दारात..?
देव मानले ग्राहकाला.!
सांगा..! पाय कसा थांबेल दुःखात...?

भरण्यास पोटाची खळगी,
उन, वारा, पाऊस नाही मला...
उशिरा जरी पोहचलो दारी,
तर.. तुमच्या...च  शिव्या नशिबाला

आरसा मि जागाचा तरी,
नेहमीच..दुर्लक्षित...
नका उचलू स्टॉल साहेब
मी आधीच आहे अडगळीत...

झोपलं हे सरकार,
आम्हास वाली कोणी नाही.?
हटवती रस्त्यावरून तेंव्हा,
कळ  मात्र काळजात जाई..

पोटासाठी राबतो रातदिन,
फिकीर मला उद्याची नाही..
पिढ्यान पीढी आयुष्याची,
पेपर विकण्यात वाया जाई..

डॉ. अब्दुल कलाम, डी. एस. कुलकर्णी..
हे ही पेपर विकायचे
तसेच ठरवले मीही स्वप्न माझे गाठायचे...

गाठिन यशाचं शिखर तेंव्हा
लोक ओळखतिल मला...
पेपरवाला पोर बघा
कीती मोठा झाला....

तांबड हे उगवत मला ठोकेल सलाम
कर्तृत्वान होईन मी ...गोठवून गोठवुन घाम

महागली ही दुनिया,
तरी वाढेना पेपरचे दाम...
उगवत्या सुर्या तुला माझा राम राम..

उगवत्या सुर्या तुला माझा राम राम..
मी पेपरवाला.....

 

आरंभ : दिवाळी अंक २०१८

संपादक
Chapters
वर्ष १, अंक ८
सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!
संपादकीय
आरंभ - मराठी ई साहित्यातील नवे पर्व!
सर्वोच्च स्वागत
एक पणती वंचितांसाठी उजळो दिवा चोहीकडे…!
व्यंगचित्रे १
व्यंगचित्रे २
व्यंगचित्रे ३
उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ
सुख आणि दु:ख
समाज माध्यम आणि मी
लक्ष्मीच्या पाऊलखुणा
दिवाळी
ओझे पुनर्जन्माचे
फेअर अँड लव्हली
कथा दिवाळीच्या
अरोग्यमय दीपावली
दीपावली
कूटकथा: पलीकडचा मी
औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...
भामटा
माजघर (आगरी कविता)
'ती' अशक्त नाही
शुभेच्छा एका चिमुकलीला
भरत उपासनींच्या चारोळ्या
पेपरवाला
'सण दिवाळी'
कविता दिवाळीनंतरची
मनातील कविता
असेही काही क्षण येतील तेव्हा...
बाप्पा
जगताय का तुम्ही...?
काय आहेस तू !
कविता
नवा प्रवास