बाप्पा
विनोद डंबे
डोंबिवली
"गप्पा राहूनच गेल्या"..
तू आला आणि गेलास ही
कळलंच नाही मला
म्हटलं जरा निवांत गप्पा मारू पण वेळच नाही मला
गप्पा राहूनच गेल्या ...
तुझ्या आगमनाच्या वेळी धांदल उडाली भारी
बाप्पाला हे शोभेल कां ते ! करता करता आरतीची वेळ झाली
गप्पा राहूनच गेल्या ...
पाहुणे आले,गप्पा रंगल्या
पंगती उठल्या फार,
मोदकाच्या गोडव्या मुळे
वामकुक्षी लागली छान
गप्पा राहूनच गेल्या....
तुझ्या सोबत काढलेली सेल्फी,सोशल मिडियावर लाईक,काँमेंट
पहाता,पहाता 'किर्तन'कधी
संपले कळलेच नाही..
गप्पा राहूनच गेल्या ...
पुढल्या वर्षी लवकर यां..
डोळे पाणावले तुला निरोप देतानां..परतीच्या वाटेवर मन उदास झाले,बाप्पाशी
बोलणे राहूनच गेले...
गप्पा राहूनच गेल्या...
पुढल्या वर्षी लवकर
ये रे बाप्पा...तुझ्याशी
भरपूर गप्पा,नक्की करीन बाप्पा...
बाप्पा गप्पा...
गणपती बाप्पा मोरया