श्रीकृष्णाची आरती - आरती नंदलाला । व्रजवासी ग...
आरती नंदलाला । व्रजवासी गोपाला ॥
करी कंजवाणी लीला । भक्तिभाव फुलविला ॥ धृ. ॥
शिरी पिच्छ मयुरांचे कंठी रुळे वनमाळा ॥
सावळे रुप कैसे । मुग्ध करी जगताला ॥ १ ॥
भगवंत बालरुपे । आला नंदाचिया घरां ॥
बाल-गोपाल संगे । खेळे नाचे प्रेमभरा ॥ २ ॥
घुमे नाद मुरलीचा । जणु वाचा प्रेमाची ॥
हारवी देहबुद्धि । साद घाली भक्तीची ॥ ३ ॥
खूण ही अंतरीची । एक राधा उमगली ॥
गोविंद नाम घेतां । स्वये गोविंद झाली ॥ ४ ॥
सान, थोर भेद-भांव । विरलेची हरीनामी ॥
निरसेच मोहमाया । चित्त चैतन्य कामी ॥ ५ ॥
संकटीं रक्षी सर्वा । सान बाळ नंदाचे ॥
गणेश दास्य याची । नित हरि-चरणाचे ॥ ६ ॥