Android app on Google Play

 

श्रीकृष्णाची आरती - दैत्यभारें पिडली पृथिवी ब...

 

दैत्यभारें पिडली पृथिवी बाळा ।

म्हणवुनि तुला येणें लागे गोपाळा ॥

भक्तप्रतिपालक उत्साह सोहळा ।

मंगळ तुजला गाती नर आणि अबला ॥ १ ॥

जय देव जय देव जय गरुडध्वजा ।

आरती ओंवाळूं तुज भक्तकाजा ॥ धृ. ॥

गुण रुप नाम नाही जयासी ।

जिवीताची तैसा होसी तयासी ॥

मत्स्य कूर्म वराह नृसिंह झालासी ।

असुरां काळा ऎसा पुढें टाकसी ॥ २ ॥

सहस्त्रनामरुपें सावळा ना गोरा ।

श्रुति नेति नेति म्हणति तुज विश्वंभरा ॥

जीवना जीवन तूंची होसी दातारा ।

न कळें पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥ ३ ॥

संता महंता घरी म्हणवी म्हणियारा ।

शंख चक्र गदा आयुधांच्या भारा ॥

दिव्य सुदर्शन घरटी फिरे अवसरा ।

सुकुमार ना स्थूल होसी गोजीरा ॥ ४ ॥

भावेंविण तुझें न घडे पूजन ।

सकळहि गंगा झाल्या तुजपासून ॥

उत्पत्ति प्रलय तूचि करिसी पाळण ।

धरुनि राहिला तुका निश्चयी चरण ॥ जय देव. ॥ ५ ॥

 

मारुती आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
श्रीगोपालकृष्णाची आरती - जयदेव जयदेव वन्दे गोपालम्...
श्रीकृष्ण आरती - अवतार गोकुळी हो । जन तारा...
श्रीकृष्ण आरती - ओंवाळूं आरती मदनगोपाळा ॥ ...
श्रीकृष्ण आरती - हरिनाम गोड झाले ॥ काय सा...
श्रीकृष्ण आरती - येउन मानवदेहा भुललों संसा...
श्रीकृष्ण आरती - कमलानन खगवाहन मणिभूण शौरी...
श्रीकृष्ण आरती - श्रावणकृष्णाष्टमिसी गोकुळ...
श्रीकृष्णाची आरती - वांकी चरणीं धरणी रांगसि य...
श्रीकृष्णाची आरती - वृंदारकगुणवृंदं परमामृतकं...
श्रीकृष्णाची आरती - निरसुनि देहत्रय अंतरमंदिर...
श्रीकृष्णाची आरती - बंधु बलरामासह गोकुळीं अवत...
श्रीकृष्णाची आरती - रजनी करकुल सुंदर देखुनि अ...
श्रीकृष्णाची आरती - कोटि कुर्वंडिया माधवपायां...
श्रीकृष्णाची आरती - हरि चला मंदिरा ऎशा म्हणती...
श्रीकृष्णाची आरती - आरती भुवनसुंदराची । इंदि...
श्रीकृष्णाची आरती - सुमनाचे शेजेवरी । पहुडली ...
श्रीकृष्णाची आरती - परमानंदा परम पुरुषोत्तमा ...
श्रीकृष्णाची आरती - दैत्यभारें पिडली पृथिवी ब...
श्रीकृष्णाची आरती - कंसराये गर्भ वधियेले सात ...
श्रीकृष्णाची आरती - जय बासूरिया तूंते कृपाळा ...
श्रीकृष्णाची आरती - नंदयशोदाबाला कुटिलालकजाला...
श्रीकृष्णाची आरती - कंसवधार्य धरातल धरिली भक्...
श्रीकृष्णाची आरती - श्यामल वर्णा षड्रिपुदमना ...
श्रीकृष्णाची आरती - जयजयजी कृष्णनाथ रुक्मिणीव...
श्रीकृष्णाची आरती - प्रभुवर जय जय जय देव गीत ...
श्रीकृष्णाची आरती - निर्गुण सगुणाकारं सह्रतभ ...
श्रीकृष्णाची आरती - कुंददंत मंदहासय नंदनंदना ...
श्रीकृष्णाची आरती - करुणाकर गुणसागर गिरिवर धर...
श्रीकृष्णाची आरती - आरती कुंजबिहारीकी । गिरिध...
श्रीकृष्णाची आरती - कोण शरण गेले विधि त्रिपुर...
श्रीकृष्णाची आरती - आरती नंदलाला । व्रजवासी ग...
श्रीकृष्णाची आरती - श्रीकृष्ण गोविंद गोपाळ रा...