प्रेरणादायी शिक्षक
श्री.दिनेश हरिभाऊ दाभाडे
कन्नड ,औरंगाबाद
(9404590560)
मनात प्रश्नांचं आभाळ दाटलंच पाहिजे...
मुलांना मीच हुशार वाटलंच पाहिजे....
चुकल्यावर त्यांना समजावून सांगा
प्रश्नांची उत्तरे नंतर मागा
सांगा त्यांना..'पाटी दप्तर बाजूला ठेवा'
वाटा 'मायेच्या शब्दांचा' रुपेरी मेवा
सरांनी सांगितलं; ते पटलंच पाहिजे....
'नाही येत त्याला' म्हणू नका कधी
मनापासून; ज्ञानाचा प्याला पाजा त्याला आधी
'शिकायचं काय?'त्याला काहीच माहिती नसतं
डोक्यातलं पान त्याचं कोरंच असतं
शाळेसाठी पोर..सकाळी नटलंच पाहिजे....
विचार करा...विचार करा....
आपलं घरचं पोर कुठं जास्त शिकतं
घरी की शाळेत ....प्रेमानं की सोंगानं
ते तसं हेही पोर; आपलं प्रेमच मागतं
तरी 'आपलं मन' असं का वागतं?
त्याचं पान भरतं;तेव्हा आपलं पोट भरतं
तरीही मन का मागे-पुढे करतं (शिकवायला)
मनावरच्या बांडगुळाला छाटलंच पाहिजे ......
समजलं नाही;तरच पोर रडतं
पाणी पाजलं;तरच रोप वाढतं
मनावरची कुंपणे बाजूला सारा
घरचंच पोर समजून; द्या ज्ञानवारा
आपल्या शब्दांखेरीज कुणी का वागतो?
ओल्या मातीलाही; दिला तो आकार घ्यावाच लागतो
पाड्यावरचं पोर माझं; पक्(खुप)हुशार वाटलंच पाहिजे...