बीट पराठा (एक पौष्टिक आहार)
मंजुषा सोनार
साहित्य:
• किसलेले बीट 3/4 वाटी
• गव्हाचे पीठ 2 वाटी
• चवीनुसार मीठ, तिखट, हळद, धणे जिऱ्याची पूड आणि ओवा
कृती:
• प्रथम किसलेले बीट एका बाऊल मध्ये घेऊन त्यात दोन वाट्या कणीक टाका.
• वरील सर्व जिन्नस एकत्र करुन कणकेत टाकावे आणि पाणी टाकून भिजवावे. नेहमी कणीक भिजवतो तसे.
• नंतर त्रिकोणी किंवा चौकोनी आकारात लाटून तव्यावर तेलाने शेकावे.
• तयार झालेला पराठा अतिशय पौष्टिक असतो.
• एरवी नुसते बीट खाल्ले असता ते थोडे उग्र लागते.
• पण पराठा करून खाल्ले तर ते सहज खाल्ले जाते.
• लाल रंग असल्याने मुलांनाही ते आवडते.
• शक्यतो हा पराठा पुदिना चटणी सोबत द्यावा किंवा सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतो. त्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
• जे जास्त तिखट खाऊ शकतात त्यांनी या पराठ्यासोबत कच्ची मिरची मीठ लावून खावी. छान लागते