अर्थक्षेत्र भाग 3: निर्देशांक
मंजुषा सोनार
ह्या लेखात आपण शेयर बाजाराचा निर्देशांक म्हणजे नेमके काय हे बघूया.
सेन्सेक्स व निफ्टी हे दोन्ही भारतीय शेयर बाजाराचे निर्देशांक आहेत. हे दोन्ही निर्देशांक भारतीय कंपन्यांची दिशा दर्शवतात.
सेन्सेक्स म्हणजे BSE हा शब्द सेन्सिटिव्ह इंडेक्स या दोन शब्दांचे एकत्रीकरण आहे आणि तो मुंबईतील शेयर बाजारातील चढ उतार दर्शवतो. सेन्सेक्स का तीस कंपन्यांनी बनला आहे तर निफ्टी पन्नास कंपन्यांनी बनला आहे.
निफ्टी म्हणजे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज चां शॉर्ट फॉर्म आहे. तो राष्ट्रीय शेयर बाजारातील चढ उतार दर्शवतो.
सेन्सेक्स ची आकडेवारी दर्शवण्यासाठी 1978 - 79 हे वर्ष आधारभूत म्हणून गृहीत धरले जाते. 1 एप्रिल 1979 रोजी सेन्सेक्स 100 मानून त्याची दररोज ची किंमत काढण्यात येते. 1 जानेवारी 1986 पासून सेन्सेक्स ची आकडेवारी प्रकाशित होण्यास सुरुवात झाली.
सेन्सेक्स व निफ्टी यांत जेव्हा वाढ होते तेव्हा त्यातील अनुक्रमे 30 व 50 या सर्वच कंपन्यांच्या दरांमध्ये वाढ झालेली असतेच असे नाही.
उदाहरणार्थ सेन्सेक्स बद्दल बोलायचे झाल्यास सेन्सेक्स निर्देशांक वाढला असे गृहीत धरा. तर त्यातील 30 कंपन्यांपैकी एखादा शेयर 10 टक्के वाढतो तर एखादा 2 टक्क्यांनी कमी झालेला सुद्धा असू शकतो. या मध्ये औषध निर्माण, आय टी, तेल, गॅस, ऍग्री कल्चर, वाहन, बँकिंग, ऑटोमोबाईल असे विविध कंपन्यांचे शेयर असतात. या तीस कंपन्यांत थोडी थोडी वाढ झाली तरी त्याचा एकत्रित परिणाम होऊन पारा वर चढतो. तसेच या तीस कंपन्यांत थोडी थोडी घट झाली तर सेन्सेक्स मध्ये घट होते. कंपनीच्या वैयक्तिक कामगिरीचा प्रभाव त्या कंपनीच्या शेयारच्या दरावर होतो. कंपनीची वाईट बातमी आली की त्या कंपनीच्या शेयर चां दर घसरतो.
सेन्सेक्स कमी झाला की सर्वच्या सर्व कंपन्यांचे भाव कमी होतील या भीतीने सामान्य गुंतवणूकदार घाबरून आपल्या हाती असलेले सर्व शेयर कमी भावात विकून मोकळे होतात. पण खरे तर यावेळेस श्रध्दा आणि सबुरी ची गरज असते.