Get it on Google Play
Download on the App Store

संस्कार + सुसंस्कृतपणा = शिक्षण

वंदना मात्रे

रोज सकाळी तो येणारा अगरबत्तीचा मंद वास आणि आजीने म्हंटलेला हरिपाठ हे म्हणजे स्वर्गाहुनी सुंदर. आजी अशिक्षित असली तरीही कधीही तिचे हरिपाठातले शब्द , उच्चार किंवा बोलायची पद्धत चुकली नव्हती.  सगळे  काही  तंतोतंत  बरोबर  असायचे.  मी आपले उठून माझे आवरले. आजी माझ्यावर खूप खुश असायची. कारणती बोलेल ते मी ऐकायचे त्यामुळे ती पण माझा हट्ट पुरवायची. तिला शुगर होती. पण तिला गुलकंद खूप आवडायचा. तिला मी द्यायचे पण रोज छोटासा घास. भारीखुश व्हायची.

पटकन आवरून गाडी काढली. तसेही आज ऑफिसला जायला कंटाळा आला होता. पण विचार केला चक्कर मारून यावे. ऑफिसमध्ये पोहचले.मॅनेजर,सेक्रेटरी,ऑफिस स्टाफ ह्यांची मिटिंग घेतली. अन प्रोजेक्टची फाईल त्यांच्या हाती दिली. बॅग घेतली गाडी काढली ती थेट गेट वे च्या पार्किंग मध्ये थांबवली.

सकाळी येताना पाहिले होते. आज गेट वे च्या फूटपाथवर" युनिव्हर्सल फ्लॉवर्स एक्झिभिशन" होते. रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या आकाराची फुले पाहून मन खूपउत्साहित तसेच थक्क होऊन गेले होते. त्यांना स्पर्श करण्याचा मोह आवरत नव्हता. त्यांच्या सुगंधाने मन प्रफुल्लित व्हायचे. सगळ्यांची गर्दी जमा झाली होती.सगळेजण प्रदर्शन बघत होते. येणारी- जाणारी माणसे शाळेतील मुले त्यांचे पालक. मोठ्या माणसांचे ठीक आहे पण लहान मुलांनाही त्या प्रदर्शनाची ओढ लागलीहोती. ती मुले आईचा हाथ पकडून ओढून आईला तिकडे नेत होतीत पण त्यांचे पालक घरचा अभ्यास असल्या कारणाने मुलांना ओढून पुन्हा घरी नेत होतीत.

इवल्याशा जीवाला ओढ होती प्रदर्शन बघण्याची पण फुरसत नव्हती. मनाला सारखे वाटत होते काय ते आपले दिवस होते. शाळेचा पुर्ण दिवस खेळकरपणे पणपद्धतशीरपणे पार पडत होता. शाळेतील शिक्षकांमध्ये नेहमीच एक आई दिसली. वटारलेले डोळे आपण चुकल्याची निशाणी होती.पण योग्य काम केले म्हणूनशाबासकी पण चटकन मिळायची. नेहमीच शिकवताना त्यांनी प्रेमाने समजावले. तरुणपणात अलगद ध्येयाचे बी रूजवले त्याला कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचाचारा-पाणी घालायला शिकवले. पुस्तकामधले सगळे काही आले पाहिजे पण कंटाळून नाही तर त्यात रस घेऊन शिका.मगच तुम्ही खर्या अर्थाने ज्ञानी व्हाल.

त्यांनी फक्त ज्ञानी नाही बनविले तर संस्कारीत सुद्धा केले. त्यामुळे घरच्या आईपेक्षा शाळेतील आई खूप आवडायला लागली. पुस्तकी किडा न बनवता सामाजिकज्ञान सुद्धा दिले. अनेक प्रकारचे सामान्य ज्ञान दिले. स्वावलंबनाचा धडा खूप छान शिकवला . जे काही करायचे ते स्वतः च्या हिम्मतीवर करायचे. कितीदा चुकलेतरीही चालेल पण पुन्हा प्रयत्न करा अन यश मिळवाच. सगळे एकत्र असलो की अनेक कोडी सुटतात हा संदेश त्यांनी आम्हाला प्रोजेक्टसच्या माध्यमातून दिला.प्रोजेव्टस् मधून आपले कौशल्य प्रसिद्ध करायचे हे शिकवले.

कधीही अभ्यासाचा आणि पुस्तकांचा कंटाळा येईल इतपत बेजार केले नाही. उलट अभ्यास करणे , पुस्तकं वाचणे हा आमचा छंद होऊन गेला. पुस्तक आणि वाचकह्यांमध्ये अनोखे नाते असते हे जाणवून दिले. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत मध्ये पण शिकलो. पण कधी कुठलीही भाषा किचकट वाटली नाही. कारण ती भाषाशिकवणारी शिक्षिका पण तेवढ्याच सोज्वळ होत्या. त्यामुळे ती भाषा फक्त शिकली गेली नाही तर त्या भाषेच्या तळाशी जाऊन ती जाणून घ्यायची ओढ सुद्धा निर्माणझाली.

आम्ही शाळेत असताना कधीही आम्हाला आमच्या बॅगचे ओझे वाटले नाही कारण सगळे विषय ठरले गेले होते. स्वतः च्या मातृभाषेत शिकणे  म्हणजे स्वतःच्या  आंब्याच्या  झाडावर  बसुन मनसोक्त आंबे खाणे होय.

आरंभ : मार्च २०१८

संपादक
Chapters
वर्ष १, अंक 3 संपादकीय शिक्षण.. की शोषण? परीक्षा भारतीय शिक्षण व्यवस्था : एक दुर्दैव नागरिक शास्त्र मधल्या सुट्टीतील धमाल मिठू इंडोलन्स (आळशीपणा) नकोच शिक्षणाची पायमल्ली कोण थांबवणार..! लिंगायत समाज हिंदू धर्मा पासून वेगळा होऊ इच्छितो. पण का ? रक्तदान श्रेष्ठदान अर्थक्षेत्र भाग 3: निर्देशांक माध्यमांतर सीरिज भाग २ RTE कायदा फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी... भाग ३ संस्कार + सुसंस्कृतपणा = शिक्षण शालिमार बीट पराठा (एक पौष्टिक आहार) सिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे मधल्या सुट्टीतली धमाल प्रेरणादायी शिक्षक नजर दूर जाते, तिथे कुणीच नसते तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली पवित्र आचार - विचाराने जीवनाचे कल्याण करणारे 'ज्ञानभास्कर' आमुख 'प्रबोधन'चे