सर्बियन माफिया
सर्बियन माफिया, यांचा धंदा दहा पेक्षा अधिक देशांत चालतो. तसे पाहिले तर ही संघटना जास्त करून स्मगलिंग आणि ड्रग्स तस्करी हे धंदे करते. परंतु या संघटनेला सुपारी घेऊन खून पडण्यासाठी जास्त ओळखले जाते. ही संघटना सुपारी घेऊन मोठमोठ्या राजकीय हत्या करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. संघटनेचा प्रत्येक सदस्य नेहमी प्राणघातक शस्त्रांनी सुसज्ज असतो. एकदा सुपारी मिळाली, की ते आपली शिकार निपटायला पूर्ण रिसर्च करतात. संघटनेत शार्प शुटर्स ची पूर्ण टीम आहे. ते खूप अंतरावरून अचूक नेम साधून कोणालाही यमसदनी धाडू शकतात. या दहा देशांमध्ये कोणतीही मोठी हत्या झाली, तर पोलीस सर्वांत आधी याच संघटनेच्या मागे लागतात. सर्बियन माफियाला मृत्यूचे सौदागर (व्यापारी) म्हटले जाते. त्यांच्या दृष्टीने या ओग्श्तीला कोणतेच महत्त्व नाही की मरणारा कोण आहे. त्यांना केवळ पैसा महत्त्वाचा.